अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:49 PM2018-07-10T14:49:39+5:302018-07-10T14:57:24+5:30
नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीची स्कूलव्हॅन रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करून चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देणारा आरोपी संजय एैर (३४, रा़ बोरगड, म्हसरूळ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़१०) तीन वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़ म्हसरूळ - दिंडोरी रस्त्यावरील वडनगरजवळ १४ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर पिडीत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़

आडगाव शिवारातील सरस्वतीनगरच्या कक़ा़वाघ इंग्लिश स्कूलमध्ये दहावीचे शिक्षण घेणा-या या विद्यार्थिनीस आरोपी संजय एैर हा मोबाईलवरून अश्लिल संदेश पाठवून त्रास देत होता़ यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने मोबाईल नंबर ब्लॉक केला मात्र मोबाईल क्रमांक बदलून एैरचे त्रास देणे सुरुच होते़ १४ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी व्हॅनने इतर मुलांसोबत शाळेत जात होती़ या व्हॅनचा आरोपीने पाठलाग केला व म्हसरूळ दिंडोरीरोडवर व्हॅन अडविली़ यानंतर हातातील बाटलीतील पाणी या मुलीच्या चेहºयावर फेकून आज पाणी फेकले उद्या अॅसिड फेकेल अशी धमकी देऊन या मुलीचा विनयभंग केला़ या प्रकारास विरोध करणाºया व्हॅनचालकासही आरोपीने दमदाटी केल्याने व्हॅनमधील इतर मुले रडू लागली होती़
पिडीत मुलीने घरी गेल्यानंतर आईला हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) गुन्हा दा्नखल करण्यात आला होता़ न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील अॅड़ शिरीष कडवे यांनी सात साक्षीदार तपासले़ म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के़बी़जोपळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते़ न्यायालयातील पैरवी अधिकारी एस़वाय़ढोले,पी़बी़माळोदे, एस़यू गोसावी यांनी गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा केला़