अश्लिल संदेश पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 02:55 PM2018-07-11T14:55:29+5:302018-07-11T14:56:20+5:30

नाशिक : चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम व हाईकवरून अश्लिल संदेश पाठवून विनयभंग तसेच मुलीच्या भावास दमदाटी केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित सलमान अकिल सय्यद (रा़ वडाळागाव ) विरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

nashik,minor,girl,Molestation,crime,registered | अश्लिल संदेश पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अश्लिल संदेश पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next
ठळक मुद्दे सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम व हाईकवरून अश्लिल संदेश

नाशिक : चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम व हाईकवरून अश्लिल संदेश पाठवून विनयभंग तसेच मुलीच्या भावास दमदाटी केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित सलमान अकिल सय्यद (रा़ वडाळागाव ) विरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीच्या घरची आर्थिक परिस्थित हालाखीची असल्याने पालकांनी तिला शाळेतून काढून घेतले़ वर्षभरापुर्वी या मुलीचा सोशल मिडीयावरील हाईक व इन्स्टाग्राम याद्वारे वडाळागावातील संशयित सलमान सैय्यद सोबत ओळख झाली़ यानंतर सलमान हा या मुलीला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचे अमिष दाखवून तसेच लहान भावास मारहाण करण्याची धमकी देऊन दुचाकीवरून घेऊन जात असे़ त्याने या अल्पवयीन मुलीला पंचवटी, नाशिकरोड या परिसरासह मॉल व हॉटेलमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला़ ही बाब आईवडीलांना समजल्यानंतर त्यांनी मोबाईल काढून घेतला व सय्यदसोबतचे संबंध संपले़

मात्र, यानंतर या मुलीने आई-वडीलांच्या फोनवरून इन्स्टाग्राम व हाईक तपासले असता त्यावर अश्लिल संदेश पाठविल्याचे दिसले़ तिने ही बाब आईवडीलांना सांगितल्यानंतर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़

Web Title: nashik,minor,girl,Molestation,crime,registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.