सराईत गुन्हेगार मोकळ खूनात तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 04:26 PM2017-09-11T16:26:38+5:302017-09-11T16:28:35+5:30

nashik,mokal,murder,three,accused,conviction | सराईत गुन्हेगार मोकळ खूनात तिघांना जन्मठेप

सराईत गुन्हेगार मोकळ खूनात तिघांना जन्मठेप

Next
ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून चॉपर, चाकू व कोयत्याने मोकळवर वारजिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांनी सुनावली़ शिक्षा

नाशिक : पूर्ववैमनस्यातून पंचवटीतील सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ उर्फ डोण्या (३२,राग़णेशवाडी, नाशिक) याचा धारदार हत्याराने खून करणाºया तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांनी सोमवारी (दि़११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ योगेश गांगुर्डे (सातूपर), प्रितम चांगले (राग़णेशवाडी, पंचवटी), व सागर खैरनार (रा़मखमलाबाद नाका, पंचवटी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ खुनाचा तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी तर खटल्यात सरकारी वकील प्रमोद पाटील यांनी काम पाहिले़
गणेशवाडीतील सप्तशृंगी देवी मंदिराजवळील भुजबळ बँकेखाली ५ जानेवारी २०१४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरोपी योगेश गांगुर्डे, प्रितम चांगले व सागर खैरनार हे तिघे इंडिका कारमधून आले़ त्यांनी सचिन उर्फ डोण्या मोकळ यास फोन करून बोलावून घेतले़ यानंतर कुरापत काढून या तिघांनी चॉपर, चाकू व कोयत्याने मोकळवर वार केले़ यामध्ये जबर जखमी मोकळ यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदेश पवार यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांच्या न्यायालयात हा खटला सुरु होता़ या खुनाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी न्यायालयात पुरावे सादर केले़ तर सरकारी वकील प्रमोद पाटील यांनी साक्षीदार तपासून खूनाचा गुन्हा सिद्ध केला़ यानंतर न्यायाधीश शर्मा यांनी या तिघांनाही खून प्रकरणी दोषी धरून जन्मठेप तसेच आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़.

Web Title: nashik,mokal,murder,three,accused,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.