पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 03:55 PM2019-08-11T15:55:20+5:302019-08-11T15:56:23+5:30
नाशिक : कोल्हापूर आणि सांगली येथील भीषण पूरपरिस्थतीनंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून, शहरातूनदेखील सुमारे तीस सेवाभावी संस्थाकडून ...
नाशिक : कोल्हापूर आणि सांगली येथील भीषण पूरपरिस्थतीनंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून, शहरातूनदेखील सुमारे तीस सेवाभावी संस्थाकडून मदतगोळा केली जात आहे. रविवारच्या सुटीचे औचित्य साधून शहरातील विविध भागांतून मदतफेरी काढण्यात आली. नाशिकरांनीदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे.
शहरातील विविध सामाजिक संस्थांनी या कामी पुढाकार घेत शहरातून एकत्रित मदत कोल्हापूर, सांगलीसाठी जमा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यांवर कोसळलेल्या आस्मानी संकटानंतर येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, त्यांच्यासाठी रोजचा दिवस संकटे घेऊन येणारा ठरत आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंचादेखील तुटवडा निर्माण झाला असून, पूरग्रस्तांचे जनजीवनच ठप्प पडले आहे. येथील एकूणच परिस्थिती पाहता पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शहरातील सुमारे तीस संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आॅल इंडिया अॅण्टी करप्शन बोर्ड, सक्षम सोशल फाउंडेशन, इंडिया स्पोर्टस संघ, महिला विकास सामाजिक संस्था, मैत्र जीवाचे फाउंडेशन, राष्टÑीय सुरक्षा जागरण मंच, निसर्ग सेवक युवा मंच महाराष्टÑ राज्य, रुग्ण सेवा, कपिला बचाव समिती, नवनाथ पंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, फिनिक्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मद्रास युवा फाउंडेशन, साई राधा स्वामी फिल्म प्रॉड््क्शन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सायबर गुन्हे जागृती, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, निसर्ग विज्ञान संस्था, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, ओम बजरंग सेवाभावी संस्था, सतीयुग फाउंडेशन, गोदावरी संवर्धन, वरुण नदी बचाव समिती, स्वयंभू ढोल-ताशा पथक आदींसह अनेक संस्था या कामी सरसावल्या आहेत.