महावितरणला औद्योगिक ग्राहकांची आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 05:07 PM2019-04-17T17:07:22+5:302019-04-17T17:08:21+5:30
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक ग्राहकांसाठी वीजेचे जादा दर आणि त्यामुळे उद्योगांवर झालेले परिणाम, मीटरचा तुटवडा आणि पायाभूत सुविधांबाबत सातत्याने ...
नाशिक: नाशिकच्या औद्योगिक ग्राहकांसाठी वीजेचे जादा दर आणि त्यामुळे उद्योगांवर झालेले परिणाम, मीटरचा तुटवडा आणि पायाभूत सुविधांबाबत सातत्याने गाºहाणे मांडूनही महावितणपर्यंत आवाज पोहचत नसतांना आता मात्र औद्योगिक ग्राहकांशी थेट संवाद साधण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांविषयी शंका उपस्थित केला जात आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी पुणे व कोंकण प्रादेशिक विभागातील औद्योगिक ग्राहकांसोबत मंगळवारी प्रकाशगड मुख्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. पुणे आणि रकोंकण प्रादेशिक विभागामधील ठाणे, वाशी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अहमदनगर, सांगली, जळगाव, रत्नागिरी, उल्हासनगर, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, महाड, वसई, मालेगाव, कुपवाड, मिरज इत्यादी औद्योगिक ग्राहक प्रतिनिधींनी या संवादात सहभाग नोंदविला.
यावेळी झालेल्या चर्चेत संजीवकुमार यांनी प्रामुख्याने मोबाईल व्हॅन, मीटर्स, फिडर सेपरेशन करणे, पायाभूत सुविधांची उभारणी इत्यादी विषयांबाबत चर्चा करून महावितरणच्या सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांनी सुचना केल्या. तसेच एमआयडीसी, महापारेषण कंपनीच्या अखत्यारितील मागण्यांबाबत विशेष प्रस्ताव सादर करणे, त्यांच्यासोबत समन्वय बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत सुचिवण्यात आले. तसेच औद्योगिक ग्राहकांसाठी राज्यभरात मीटरचा मुबलक पुरवठा, वीजजोडणीचा आॅनलाईन अर्ज , देखभाल दुरुत्ती कामांचे नियोजन, महिन्यातून एकदाच वीजपुरवठा बंद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
संवादात यावेळी दिनेशचंद्र साबू संचालक (संचालन), सतीश चव्हाण, संचालक (वाणज्यि), भालचंद्र खंडाईत, संचालक (प्रकल्प) व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.