प्राणघातक हल्ल्यातील तिघा आरोपींना चार वर्षे सक्तमजुरी शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 09:58 PM2018-05-18T21:58:43+5:302018-05-18T21:59:41+5:30

नाशिक : अनैतिक संबधाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़पांडे यांनी शुक्रवारी (दि़१८) चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ बाळू विश्वनाथ खिल्लारे, प्रदीप ज्ञानबा खिल्लारे, व गजानन कुराडे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ विंचूर गवळी शिवारात २७ फेब्रुवारी २०१५ रोजी ही घटना घडली होती़

nashik,murder,court,four,year,conviction | प्राणघातक हल्ल्यातील तिघा आरोपींना चार वर्षे सक्तमजुरी शिक्षा

प्राणघातक हल्ल्यातील तिघा आरोपींना चार वर्षे सक्तमजुरी शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देविंचूर गवळी शिवारात २७ फेब्रुवारी २०१५ रोजी घटना

नाशिक : अनैतिक संबधाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़पांडे यांनी शुक्रवारी (दि़१८) चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ बाळू विश्वनाथ खिल्लारे, प्रदीप ज्ञानबा खिल्लारे, व गजानन कुराडे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ विंचूर गवळी शिवारात २७ फेब्रुवारी २०१५ रोजी ही घटना घडली होती़

आडगाव पोलीस ठाणे हद्दीत विंचूर गवळी शिवारात नवजीवन पब्लिक स्कुलच्या मैदानावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपी बाळू खिल्लारे, प्रदीप खिल्लारे व गजानन कुराडे यांनी मयत राजू लिंबाजी हिंगोले (३०, रा़ हाताळे, ता़ शेनगाव, जि़ हिंगोली) यास लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते़ यानंतर उपचारादरम्यान हिंगोले याचा मृत्यू झाल्याने आडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

आडगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आऱपिंपरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून पुरावे गोळा केले होते़ न्यायाधीश पांडे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील संजयकुमार पाटील व वाय़डीक़ापसे यांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले़ साक्षीदार यांनी दिलेले साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश पांडे यांना शिक्षा सुनावली़ या खटल्यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी पैरवी अधिकारी पोलीस नाईक आऱएस़जोशी व पोलीस हवालदार एमक़े़माळोदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़

Web Title: nashik,murder,court,four,year,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.