नागपूरमधून पंधरा लाखांचे स्टील चोरणाऱ्यांना नाशकात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:55 PM2018-07-07T22:55:44+5:302018-07-07T22:56:08+5:30
नाशिक : नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून बांधकामाचे पंधरा लाख ५७ हजार रुपयांचे २७ टन वजनाचे स्टील चोरून त्याची नाशिकमध्ये विक्री करणाºया भंगार विक्रेत्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने शनिवारी (दि़७) सकाळी छापा टाकून अटक केली़ अजिज मुख्तार मलीक (४२, रा. गरीब नवाजनगर, धुळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़ या प्रकरणी बुटीबोरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती़
पाथर्डी परिसरातील ज्ञानेश्वरनगरमध्ये बांधकामासाठी लागणारे स्टील (लोखंडी सळई) स्वस्त दरात उपलब्ध असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे उपनिरीक्षक रवींद्र सहारे यांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून संशयित अजिज मलिक यास अटक केली़ त्याच्या सखोल चौकशीत हे स्टील त्याने नागपूरमधील बुटीबोरी परिसरातील कंपनीतून चोरल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केल्यानतर याबाबत बुटीबोरी पोलीस ठाण्याशी संपर्क करून चोरीचे स्टील त्यांच्या स्वाधीन करण्यात आले़
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, जमादार राजेंद्र जाधव, हवालदार सपकाळ, रमेश घडोजे, श्यामराव भोसले, गुलाब सोनार, राजाराम वाघ, अन्सार सय्यद, संतोष ठाकूर, मधुकर साबळे, पोलीस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, परमेश्वर दराडे, नितीन भालेराव, महिला पोलीस ललित आहेर, योगेश सानप, बाळा नांद्रे, महेंद्र साळुंखे, यादव डंबाळे, शिपाई जयंत शिंदे, विजय पगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली़