नाशिककरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 03:20 PM2019-08-04T15:20:23+5:302019-08-04T15:23:23+5:30
नाशिक : जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे तर हवामान खात्याने ...
नाशिक: जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे तर हवामान खात्याने पुढील चोवीस तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे नाशिककरांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. गोदावरीत होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरीने रौद्र रूप धारण केलेले असल्यामुळे नागरिकांनी पूर पाहाण्यासाठी पुलांवर तसेच नदीकाठी उभे राहू नये अशा सतर्कतेच्या सुचना देखील केल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. यातच पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदी धोक्याच्या पातळीपर्यंत वाहत आहे. क्षणाक्षणात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना सतकर्तचे आदेश देण्यात आले आहेत. नदीला आलेला पूर पाहाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुलांवर पोलीस बंदबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी बॅरिकेडस् टाकून वाहनांना पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात त्र्यंबकेश्वर, आंबोली या परिसरात तीनशे मिली.पेक्षा अधिक पाऊस सुरू आहे तर गंगापूर, काश्यपी, गौतमी या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्यामुळष सखल भागात राहाणाºया नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. पूर पाहाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांना नागरिकांना हटविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पावसाचा जोर पाहाता जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिककरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुराचा आढावा घेण्यासाठी सकाळी सर्व अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी धरण क्षेत्रातील पाऊस आणि होणारा विसर्ग याची माहिती घेतली तसेच नदीकाठच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देखील घेतली. यावेळी त्यांनी अधिकाºयांना तत्पर मदतकार्य पोहचविण्याच्या सुचना दिल्या आहेत.