नाशिकमध्ये रविवारी नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 03:41 PM2018-11-24T15:41:18+5:302018-11-24T15:47:08+5:30

नाशिक : मोटर फेडरेशन स्पोर्ट्स  कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने जानेवारीपासून सुरू झालेल्या नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपची पाचवी फेरी नाशिकमध्ये ...

nashik,national,supercross,championship,sunday | नाशिकमध्ये रविवारी नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप

नाशिकमध्ये रविवारी नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप

googlenewsNext
ठळक मुद्देआॅस्ट्रेलियाच्या दोन रायडर्सचे फ्रीस्टाइल मोटोक्रॉस स्टंटचे प्रात्यक्षिकही बघण्याची संधी

नाशिक : मोटर फेडरेशन स्पोर्ट्स  कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने जानेवारीपासून सुरू झालेल्या नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपची पाचवी फेरी नाशिकमध्ये रविवारी, दि. २५ रोजी सकाळी १० वाजता रंगणार आहे. पेठेनगर येथील मैदानावर होणाऱ्या मोटारबाइकचा थरार नाशिककरांना यावेळी अनुभवास मिळणार आहेच शिवाय आॅस्ट्रेलियाच्या दोन रायडर्स चे फ्रीस्टाइल मोटोक्रॉस स्टंटचे प्रात्यक्षिकही बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
स्पर्धेचे संयोजक श्याम कोठारी यांनी सांगितले की, कोचीन, गोवा, कोईम्बतूर, जयपूर येथे या स्पर्धेच्या चारफेऱ्या  पार पडल्या असून, नाशिकला पाचवी फेरी होणार आहे. शेवटची फेरी ही बडोदा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी पेठेनगर (मुंबई-आग्रा मार्ग, इंदिरानगर) येथे जवळपास १२ जम्प, डबलजम्पचे ट्रॅक तयार करण्यात आले आहे. या स्पर्धा आठ गटांत खेळविण्यात येणार असून, यासाठी १२० रायडर्संनी प्रवेशिका पाठविल्या आहेत.
नाशिकचे यश पवार, हर्षल कडभाने स्पर्धक सहभागी असणार आहे. ही स्पर्धा गॉडस्पीड रेसिंग पुणे यांनी नाशिक येथे आयोजित केली आहे . पेठे इस्टेट, पेठेनगर येथे विशेष डर्ट ट्रॅक बनवलेला असून, नाशिककरांसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे . या स्पर्धेमध्ये विदेशी बनावटीच्या टू स्ट्रोक व फोर स्ट्रोक गाड्या बघण्याची संधीदेखील नाशिककरांना मिळणार आहे.
एकूण विविध आठ गटांत ही स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये केरळचा सीडी जिनन आणि योनाक नोव्हा यांच्यात विजेतेपदासाठी चुरस बघायला मिळणार आहे. याशिवाय आॅस्ट्रेलियाचे फ्रीस्टाइल बाइक स्टंटबाज जॉर्डन स्पे्रग व शॉन वेब यांच्या करामती नाशिककरांना पाहण्याची संधी आहे. स्पर्धेला रविवारी, सकाळी १० वाजता सुरु वात होणार असून, आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तर दुपारी २.३० वाजता पारितोषिक वितरण होणार आहे.

Web Title: nashik,national,supercross,championship,sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.