राष्ट्रवादीच्या मद्यधुंद पदाधिकाऱ्याची पोलिसांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 08:56 PM2018-08-03T20:56:54+5:302018-08-03T21:02:59+5:30
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष संशयित धीरज मगर (३२, रा़ हिरावाडी रोड, पंचवटी) याने गस्तीवर असलेल्या बीटमार्शल व पोलीस शिपायास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास हिरावाडीतील एसएसडीनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मगर यास अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्यानाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष संशयित धीरज मगर (३२, रा़ हिरावाडी रोड, पंचवटी) याने गस्तीवर असलेल्या बीटमार्शल व पोलीस शिपायास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास हिरावाडीतील एसएसडीनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मगर यास अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
पंचवटी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल संदीप पोटिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री दीड वाजेच्या सुमारास ते पोलीस शिपाई शेळके यांच्यासह एसएसडीनगरमध्ये गस्त घालीत होते़ यावेळी एका सोसायटीतील अंधारात उभ्या असलेल्या संशयित मगर यास हटकले असता त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ यावेळी पोलिसांना तो मद्यधुंद असल्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात आणले असता त्याने गोंधळ घालत पोलीस निरीक्षक ढमाळ व पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली़
पोलीस अधिका-यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा गोंधळ सुरू होता़ यामुळे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्याच्या नशेत असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिका-यांनी दिला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.