जलशुद्धतेसाठी जल असायला तर हवे (विश्लेषण)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 04:16 PM2019-04-08T16:16:37+5:302019-04-08T16:17:38+5:30
नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. नाशिक जिल्हा राज्यात कसा शुद्ध पाण्याचा जिल्हा आहे हे सांगण्याची धडपड जिल्हा परिषदेकडून सातत्याने होत आहे. अगदी कालपर्वापर्यंत ऐन कडाक्याच्या ऊन्हात आणखी काही गावांची नावे जाहि करून येथे जणू पाण्याच प्रश्नच नाही असे भासविण्यात आले. ज्या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोताची आणि दुषित पाणीपुरवठ्याची तक्रार आहे अशा गावांमध्ये सर्व उपायोजना करून पाणी सुरक्षित करण्यात आल्याचेही जाहिर करण्यात आले. वास्तविक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई असल्याचे जाहिर केलेले असतांना जिल्हा परिषदेचा स्वच्छ पाण्यासाठीचा आटापिटा कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसे आणि शुद्ध पाण्यासाठी मुळात पुरेसे पाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. परंतु पाण्याचा ठणाणा असतांनाही सर्वकसे ‘सुजलाम सुफलाम’ आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यामागची भुमिका स्पष्ट केली जात नसली तरी ती स्पष्ट होतच नाही असे आजिबातच नाही.
जिल्हयातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबतचा छातीठोक दावा केवळ प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारावर नव्हे तर मानगुटीवर बसू ते कागदे रंगविली गेली त्यातून आला असे म्हणण्यासारखी परिस्थिी समोर आलेली आहे. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाची असल्याने नियमित पाणी शुद्धीकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देशही आहेत. पाणी व स्वच्छता विभागा अंतर्गत शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर ही माहिती अपलोड होणार असल्याने शुद्धतेचे आणि टंचाईमुक्तीचे दावे करण्यात येस आहेत. दुसरीकडे बागलाण तालुक्यातील ३५ गावे, ४ वाड्या - २८ टॅँकर, चांदवड तालुका १० गावे, १७ वाड्या- ८ टॅँकर, देवळा ९ गावे, १६ वाड्या- ७ टॅँकर, मालेगाव २२ गाव, ७५ वाड्या- ३२ टॅँकर, नांदगाव १६ गावे, १३८ वाड्या- ३१ टॅँकर, सुरगाणा ५ गावे, १ वाडी- ३ टॅँकर, सिन्नर १७ गावे, १६ वाड्या- ४४ टॅँकर, येवला ५० गाव, ३० वाड्या - ३१ टॅँकर असे नाशिक जिह्यात एकूण १३४ गावे व ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक जास्त ४४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याला काय उत्तर देणार प्रत्यक्षात पाणी मिळविण्यासाठी जेथे धडपड सुरू आहे तेथे स्त्रोताचे शुद्धीकरण आणि स्वच्छ पाण्याचा दावा खरा कसा मानावा.