करयोग्य मुल्यवाढ केल्याने महापालिकेवर आज हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:15 PM2018-04-22T21:15:05+5:302018-04-22T21:15:05+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरूद्ध शहरात तीव्र विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार दि. २३ रोजी होणाऱ्या महासभा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आयुक्तांच्या निर्णयाला विरोध : सभागृहात आणि सभागृहाबाहेरही
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरूद्ध शहरात तीव्र विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार दि. २३ रोजी होणाऱ्या महासभा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढी संदर्भात घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरत असतांनाच त्यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ सुचविल्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहे. त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक एवटल्याने सोमवारी होणारी महासभा वादळी होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची आचारसंहिता जाहिर झाली असतांनाच महासभा होत असल्याने या सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही. मात्र सदस्य आपल्या भावना व्यक्त करून जनतेचे प्रतिनिधीत्व सभागृहात करणार आहेत.
करयोग्य मुल्यवाढीमुळे निर्माण होणाºया कराचा मुद्या गंभीर बनला आहे. या करवाढीच्या विरोधात शेतकरी वर्गासह कारखानदार, व्यावसायिक संघटित होत असून ठिकठिकाणी आयुक्तांविरोधात मेळावे घेण्यात आले आहे. दि. २३ रोजी रोजी दुपारी १ वाजता होणाºया महासभेत करयोग्य मुल्यवाढीचा मुद्या अग्रक्रमावर असल्याने त्या विरोधासाठी भाजपासह अन्य राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली आहे.