नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:51 PM2018-02-23T15:51:57+5:302018-02-23T15:55:27+5:30

नाशिक : बेकायदेशीरपणे महापालिकेचे पाणी वापरणारा सोसायटी चेअरमन, बांधकाम व्यवसायिक व नळजोडणी कारागिराविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा असून पाथर्डी फाटा परिसरात महापालिकेने शोध घेतल्यास आणखी अशी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे़

nashik,nmc,water,theft,Indiranagar,police,crime,registered | नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा

नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्दे गुन्हापाथर्डी फाटा : बांधकाम व्यवसायिक, चेअरमन, नळजोडणी कारागिरावर गुन्हा

नाशिक : बेकायदेशीरपणे महापालिकेचे पाणी वापरणारा सोसायटी चेअरमन, बांधकाम व्यवसायिक व नळजोडणी कारागिराविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा असून पाथर्डी फाटा परिसरात महापालिकेने शोध घेतल्यास आणखी अशी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे़

महापालिकेचे उपअभियंता संजीव बच्छाव यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पाथर्डी फाटा परिसरात माऊली प्राईड अपार्टमेंट आहे़ या सोसायटीसाठी नळजोडणी कारागिर संजू सुखदेव रोकडे याने जानेवारी २०१४ मध्ये महापालिकेच्या पाईपमधून चेअरमन व बांधकाम व्यवसायिक मदन बाकेराव ढेमसे यांच्या सांगण्यावरून नळजोडणी करून दिली़ २०१४ पासून या अपार्टमेटमधील रहिवासी ेमहापालिकेचे पाणी वापरत असून याबाबत नळजोडणी कारागीर, बांधकाम व्यवसायिक वा सोसायटी चेअरमन यांनी महापािलकेस माहिती दिली नाही वा पाणीपट्टी न भरता गत आठ वर्षापासून अनधिकृतपणे पाण्याचा वापर केला़

चार वर्षांपासून अनधिकृतपणे चोरी करून सोसायटीने पाण्याचा वापर केला असून यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधात पाणीचोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, महापालिकेतील अधिकाºयांनी अशाच प्रकारे मोहिम सुरू ठेवून चोरीने पाणी वापरणाºयाविरोधातील कारवाई सुरू ठेवण्याची मागणी केली जाते आहे़

Web Title: nashik,nmc,water,theft,Indiranagar,police,crime,registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.