दलितवस्ती कामांचा दर्जा राखण्याच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 02:29 PM2018-09-07T14:29:18+5:302018-09-07T14:30:49+5:30

नाशिक : दलिसवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष दयावे असे आदेश जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.

nashik,notification,status,dalit,house,work | दलितवस्ती कामांचा दर्जा राखण्याच्या सुचना

दलितवस्ती कामांचा दर्जा राखण्याच्या सुचना

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : समाजकल्याण सभेत विविध विषयांवर चर्चा

नाशिक : दलिसवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष दयावे असे आदेश जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी दलितवस्ती कामाचा आढावा घेतांना दर्जायुक्त कामे करण्याची अपेक्ष चारोस्कर यांनी व्यक्त केली. दलितवस्तीची कामे निकृष्ठ होत असल्याच्या तक्रारी असतात ही कामे चांगल्या दर्जाची व्हावी, कामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी गटविकास अधिकारी, सहायाक गटविकास अधिकारी यांनी कामांवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दलितवस्ती कामांचे प्रस्ताव २५ सप्टेंबर पर्यंत सादर करण्याबाबत सुचना करण्यात आल्या तर यानंतर आलेले प्रस्तावच स्विकारले जाणार नसल्याचे चारोस्कर यांनी जाहिर केले.
याप्रसंगी प्रभारी समाजकल्याण अधिकारी निलेश पाटील यांनी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व योजना राबविण्याबाबत संबधिंतांना सुचना केल्या. सभेस वनविभागाचा आढावा सोनाली जाधव यांनी मांडला. यावेळी त्यांनी वनविभागाच्या योजनांची माहितीही दिली.
सन २०१३-१४ ते २०१७-१८ या वर्षात २९२ हायस्मास्टची कामे करण्यात आलेली होती त्यापैकी बंद असलेल्या कामांचा आढावा घेण्यात येऊन बंद हायमास्टची देखभाल दुरूस्ती संबंधित ग्रामपंचायतीने करण्याबाबतच्या सुचनाही देण्यात आल्या. वनअनुदानाबाबत सन २०१७-१८ मध्ये १.६५ लक्ष इतका अल्पनिधी असल्याने कोणते काम घ्यावे याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. जादा निधी मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वनविभागाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, कन्हू गायाकवाड, वनिता शिंदे आदि उपस्थित होते.

Web Title: nashik,notification,status,dalit,house,work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.