तोतया पोलिसाकडून वृद्धेचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:23 PM2017-09-09T23:23:55+5:302017-09-09T23:27:10+5:30
नाशिक : पुढे वातावरण चांगले नाही. अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी सव्वा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकिना सैफउद्दीन जावरावाला (६५, रा. फतेह मुबीन सोसायटी, शंकरनगर) ही वृद्धा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परिसरातील स्वानंद सोसायटीसमोरून आपल्या घराकडे पायी जात होत्या़ त्यावेळी राखाडी रंगाच्या दुचाकीवर आलेल्या संशयिताने जावरावाला यांना, मी पोलीस असून, पुढे वातावरण चांगले नाही. अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा़ यावेळी मदतीच्या बहाण्याने हातातील सुमारे १ लाख २० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़