नाशिकच्या रविवार कारंजावरून लाखाची रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:47 PM2018-03-09T17:47:14+5:302018-03-09T17:47:14+5:30

नाशिक : अ‍ॅक्टिवा दुचाकीच्या हँडलला अडकवलेली एक लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरील दोघा संशयितांनी लांबविल्याची घटना गुरुवारी (दि़ ८) दुपारच्या सुमारास रविवार कारंजावरील शनी गल्लीजवळ घडली़

nashik,one, lakh,cash,bag,theft,ravivar,karanja | नाशिकच्या रविवार कारंजावरून लाखाची रोकड लांबविली

नाशिकच्या रविवार कारंजावरून लाखाची रोकड लांबविली

Next
ठळक मुद्देदुचाकीच्या हँडलला अडकवलेली एक लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरील दोघा संशयितांनी लांबविली बॅग

नाशिक : अ‍ॅक्टिवा दुचाकीच्या हँडलला अडकवलेली एक लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरील दोघा संशयितांनी लांबविल्याची घटना गुरुवारी (दि़ ८) दुपारच्या सुमारास रविवार कारंजावरील शनी गल्लीजवळ घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार कारंजावरील बोरा बिल्डिंगमध्ये सतीश बोरा राहतात़ गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते अ‍ॅक्टिवा दुचाकीने (एमएच १५, एफजी ४४२८) रविवार कारंजा परिसरात आले होते़ यानंतर कामानिमित्त शनी गल्लीतील सागर पुस्तकालयाजवळ आले असता त्यांनी दुचाकीचे हॅण्डल लॉक केले व आपल्याजवळील बॅग हँण्डलला लटकवली होती़ या कालावधीत दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्या दुचाकीला अडकविलेली बॅग चोरून नेली़ या बॅगमध्ये एक लाख रुपये रोख व कागदपत्रे होती़

दुचाकीवरील बॅग चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली़ दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashik,one, lakh,cash,bag,theft,ravivar,karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.