बंधाऱ्यातील पाणी चोरी रोखले तरच विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 07:00 PM2019-04-16T19:00:35+5:302019-04-16T19:02:40+5:30

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधाराºयातील अनाधिकृत पाणी उचलणाºया ...

nashik,only,the,water,from,dam,stops,water | बंधाऱ्यातील पाणी चोरी रोखले तरच विसर्ग

बंधाऱ्यातील पाणी चोरी रोखले तरच विसर्ग

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : भरारी पथकाने जप्त केल्या ३० मोटारी

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधाराºयातील अनाधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे असून भरारी पथकाने तत्काळी ३० अनाधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.
चेहडी आणि लष्करी हद्दीतील बंधाºयातून ज्या परिसरांना पाणीुपरवठा केला जातो तेथे आता पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळ संस्थानी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे पाणी चोरीच्या प्रकारामुळे बंधाºयातील पाणी साठी कमी होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत अ ाहे. जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ कारवाई करीत अनाधिकृत शेतकºयाना दणका दिला आहे. त्यांचे कृषीपंप तसेच स्टार्टर देखील तोडून टाकले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दारणा नदी कोरडी आहे तर नाशिकरोेड चेहडी व देवळाली लष्करी बंधाºयात दोन दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असल्यामुळे नाशिक महापालिका, भगूर-सिन्नर नगरपालिका औद्योगिक विकास मंडळासह विविध गावातील संस्थांनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करताच जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन अनाधिकृत वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. पाण्याचा अनिधकृत उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागासोबत पाणी वापर संस्थाचे सहकार्याने भरारी पथक नेमले आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग पी.एम कुलकर्णी.आर.जी सोनवणे शेख वाणी, नाशिक मनपाचे डी.एल.खेलुकर.एटी यंदे, भगुर पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील रवींद्र संसारे, सिन्नर पालिका मुख्याधिकारी व्यकटेश दुर्वास, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळचे डी.जे.सोनजे, महेंद्र कराटे, फकीर उगले, पुर्वा माळी आदींनी चेहडी ते साऊथ देवळाली नदीच्या काठावर सर्व गाव परीसरात पाहाणी करून अनेक मोटारी जप्त करून पंप काढण्यात आले. जोपर्यंत पाणी दुष्काळी परिस्थिती आहे तो पर्यंत दिवस रात्री भरारी पथक कारवाई करत राहणार असल्याने शेतकºयांनी पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे.

Web Title: nashik,only,the,water,from,dam,stops,water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.