कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी निवदेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 08:15 PM2020-02-10T20:15:31+5:302020-02-10T20:17:13+5:30
नाशिकरोड , : कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटेनाच्या वतीेने विभागीय उपायुक्त रघुनाथ ...
नाशिकरोड, : कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटेनाच्या वतीेने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.
गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने मागील काही दिवसापासून राज्यातील कांद्याचे बाजारभाव घसरले आहे. आंध्र प्रदेशातील केपी कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे. सर्वात जास्त कांद्या उत्पादक महाराष्ट्रात असून येथे चांगल्या पध्दतीने कांदा उत्पादन होते. असे असतांनाही Ñ शेतक-यावर अन्याय करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अतिवृष्टमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना निर्यात बंदीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या काद्यांला परदेशी वारीसाठी मुक्त केले पाहिजे. राज्य सरकारने याबाबात लक्ष घालून केंद्र सरकारकडून तात्काळ निर्यात खुली करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे .
निवेदनावर भारत दिघोळे, सोमनाथ गिते, शैलेंद्र पाटील, अमोल गोर्डे, भिमचंद पालवे, महादेव जायभावे, बी.टी. दिघोळे आदींच्या सह्या आहेत.
फोटो कॅप्शन :
विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देतांना भारत दिघोळे, सोमनाथ गिते, शैलेंद्र पाटील, अमोल गोर्डे, भिमचंद पालवे, महादेव जायभावे, बी.टी. दिघोळे आदी.