कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 07:45 PM2020-01-07T19:45:50+5:302020-01-07T19:46:34+5:30
आज संप : संपात सहभागी होणाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार नाशिक : राज्य शासकीय कर्मचारी विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.८) ...
आज संप : संपात सहभागी होणाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार
नाशिक : राज्य शासकीय कर्मचारी विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.८) देशव्यापी संप पुकारणार असल्याने या संपापासून कर्मचाऱ्यांना परावृत्त करण्याबरोचर त्यांनी संपात सहभागी होऊ नये यासाठी कर्मचाºयांची रजा नामंजूर करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. दरम्यान, कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून सर्व शासकीय कार्यालये सुरळीत सुरू रहावीत यासाठीच्या उपाययोजना करण्याचेदेखील नियोजन करण्याच्या सूचना शासनाकडून विभागप्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत.
राज्य शासकीय कर्मचाºयांच्या संघटनांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात देशव्यापी लाक्षणिक संपाची नोटीस शासनाला दिलेली आहे. या संपाला महाराष्टÑ राजपत्रित अधिकारी महासंघ यांनीदेखील पाठिंबा दर्शविल्याने राज्य शासनापुढेच पेच निर्माण झालेला आहे. कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून संपाच्या काळात कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार संपात सहभागी होणाºया कर्मचाºयांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. कर्मचाºयांनी संपात सहभागी न होता नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कर्मचाºयांशी संपर्क साधण्याचेदेखील कळविण्यात आलेले आहे.
संपात कर्मचारी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून संप काळात कार्यालय नियमित उघडणे आणि बंद करण्याची व्यवस्था अधिकाºयांना करावी लागणार आहे. प्रसंगी पोलीस किंवा गृहरक्षक दलाची मदत घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे.