पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:24 PM2017-08-20T23:24:08+5:302017-08-20T23:30:09+5:30

nashik,pan,card,club,crime,registered | पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Next
ठळक मुद्देगुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष परतावा न देता उडवाउडवीची उत्तरे पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेऊन मुदत संपल्यानंतरही परतावा न देणाºया पॅनकार्ड क्लब कंपनीच्या संचालकांसह आठ संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश बाबूराव पवार (रा़ राणाप्रताप चौक, सिडको) यांना पॅनकार्ड क्लब कंपनीचे संचालक संशयित सुधीर शंकर मोरावेकर, शोभा रत्नाकर बर्डे, उषा अरुण तारी, मनीष कालिदास गांधी, चंद्रसेन गणपतराव भिसे, रामचंद्र रामकृष्ण (सर्व रा. मुंबई) व कंपनीचे नाशिकमधील शाखाधिकारी विक्रम अरिंगळे, एजंट बापूराव त्र्यंबक इंगळे यांनी संगनमत करून डिसेंबर २०१२ मध्ये कंपनीच्या विविध मुदत ठेवी योजनांची माहिती दिली. तसेच कंपनीत ठेवी केल्यास मुदतीनंतर त्वरित आकर्षक परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन ५० हजार ४०० रुपयांची रक्कम ठेवण्यास प्रवृत्त केले़
पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतविलेल्या ठेवीची मुदत संपल्याने पवार यांनी संबंधितांकडे पैशांची मागणी केली असता परतावा न देता उडवाउडवीची उत्तरे दिली़ यामुळे विश्वासघात तसेच गुंतवणुकीचा अपहार करणाºयांविरोधात पवार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधिताविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़

Web Title: nashik,pan,card,club,crime,registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.