पंचवटी एक्सप्रेस फिरली माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:34 PM2019-08-04T14:34:56+5:302019-08-04T14:35:29+5:30

नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपुर्णपणे ठप्प झाली असून त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर ...

nashik,panchavati,express,turned,around | पंचवटी एक्सप्रेस फिरली माघारी

पंचवटी एक्सप्रेस फिरली माघारी

Next
ठळक मुद्देतीन गाड्या रद्द : दुरांतो एक्सप्रेस इगतपुरीत अडकली

नाशिक: मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपुर्णपणे ठप्प झाली असून त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर देखील झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी नाशिकरोड आणि इगतपुरी स्थानकात अडकून पडले आहेत. दरम्यान, दुरांतो आणि मंगला एक्सप्रेस या गाड्या इगतपुरी स्थानकातच थांबविण्यात आल्या आहे तर पंचवटी एक्सप्रेसला इगतपुरीहून पुन्हा मनमाडला पाठविण्यात आले.
सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीला प्रचंड फटका बसला असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिकहून मुंबईला जाणारी पंचवटी एक्स्प्रेस गाडी मनमाडून नियोजित वेळेत मुंबईकडे सोडण्यात आली मात्र पावसाचा जोर वाढल्याने इगतपुरीतून गाडीला पुन्हा मनमाडकडे पाठविण्यात आली. इगतपुरीत पोहचलेल्या दुरांतो आणि मंगला एक्सप्रेस या गाड्यांना पाच तास इगतपुरी स्थानकातच पुढे जाण्यासाठीची वाट पाहवी लागली मात्र या मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे या गाड्यांना इतगतुरीत थांबून ठेवण्यात आले आहे. नाशिक आणि मनमाडकरांसाठी महत्वाची असलेल्या पंचवटी एक्सप्रेसलाही इगतपुरीतून पुन्हा मनमाडकडे पाठविण्यात आले.
विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून असंख्य प्रवासी हे गाड्यांमध्ये आणि रेल्वेस्थानकातच अडकून पडले आहेत. उत्तरेतून आलेल्या रेल्वे या इगतपुरीत थांबून ठेवण्यात आल्याने प्रवाशांना संपुर्ण दिवस गाडीतच काढावा लागला. राज्यराणी, सेवाग्राम तसेच गोदावरी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: nashik,panchavati,express,turned,around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.