पंचायत समिती कार्यालायत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:52 PM2019-04-11T17:52:56+5:302019-04-11T17:54:00+5:30
गंगापूर : सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असून आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय, विकासकामासंबंधीचा वित्तीय विषय नसल्याने नाशिक पंचायत समितीत सध्या शुकशुकाट ...
गंगापूर : सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असून आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय, विकासकामासंबंधीचा वित्तीय विषय नसल्याने नाशिकपंचायत समितीत सध्या शुकशुकाट आहे. अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामांमध्ये व्यस्त असल्याने पंचायत समिती कार्यालायत सुनेसुने झाले आहे.
पंचायत समिती तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय असल्याने जिल्हाभरातून असंख्य कामे घेऊन नागरिक पंचायत समिती कार्यालयात येतात. मात्र आचारसंहिता असल्याने पंचायत समितीत सदस्य फिरकत नाहीत. अधिकरी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लागल्याने ते सुद्धा याठिकाणी फिरकत नसल्याने कार्यालाय परिसरात शुकशुकाट पसरला आहे. पंचायत समितीचे कार्यालये उघडे असले तरी कोणतेही कामकाज होत नसल्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे.
बांधकाम विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग, ल.पा. विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी भागात थोड्याफार प्रमाणात काही कर्मचारी आहेत मात्र इतर विभागांमध्ये संपुर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो.
अपापल्या पक्षातील वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे सदस्यांना पक्षाने आपापल्या भागात संपर्क वाढविण्यासह लोकसभेच्या उमेदवारासाठी जोमात काम करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांची कार्यालयाकडे पाठ फिरविल्याचे दिसते. एरवी ग्रामसेवकांच्या कार्यालयात नेहमी वर्दळही कमी झाली आहे.