कलाभूषण पुरस्काराने नामवंत कलाकारांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:13 PM2017-08-20T23:13:29+5:302017-08-20T23:13:42+5:30
नाशिक : महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सवानिमित्त शाहीर दत्ता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील अकरा नामवंत कलाकारांना माजी महापौर अशोक दिवे व मान्यवरांच्या हस्ते कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ रविवारी (दि़२०) पंचवटीतील खांदवे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महाकवी वामनदादा कर्डक संगीत कला मंचने केले होते़
संकल्पित रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शाहीर दत्ता वाघ (नाशिक), विजयराज निकम (नाशिक), रूपचंद भुजबळ (मुंबई), अनिल बुकाणे (कल्याण), दिंगबर वाघ (ओझर), हरीष भालेराव (नाशिक), हनिफ सौदागर (नाशिकरोड), मधुकर घुसळे (कल्याण), उत्तम पगारे- सातपूर (मरणोत्तर), आनंद महिरे (मनमाड), शेख मास्टर (नाशिक) या अकरा कलाकारांना कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला़
यावेळी गायक विजयराज निकम, दिंगबर वाघ, शाहीर दत्ता वाघ या कलाकारांनी वामनदादा कर्डक यांना गीतांजलीतून अभिवादन केले़ त्यांना ढोलकीवर दादूजी घाटे, तबल्यावर राजेश भालेराव, संवादिनीवर हनिफ सौदागर, तर की-पॅडवर अमर जाधव व संदीप जाधव यांनी संगीतसाथ केली़ यावेळी नगरसेवक शांता हिरे, प्रियंका घाटे, शशी उन्हवणे, राहुल तूपलोंढे, दुष्यंत वाघ उपस्थित होते़ प्रज्ञा काळे यांनी सूत्रसंचालन केले़ माधवराव गायकवाड यांनी आभार मानले़ कार्यक्रमासाठी मंचचे सरचिटणीस फु लचंद जाधव व खजिनदार शंकर जाधव यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले़