पंचवटीतील मोबाईलचोर टोळीकडून साडेपाच लाखांचे मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:50 PM2018-04-28T15:50:26+5:302018-04-28T15:50:40+5:30
नाशिक : शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाईल बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाईल चोरी करणा-या दोन टोळ्यांना पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ्यांमधील पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपए किंमतीचे विविध कंपन्यांचे तब्बल १०९ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

शहर व परिसर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दिवसा व रात्रीच्यावेळी दुचाकीवरून जाणारे वा पायी जाणा-या नागरिकांना रस्त्यात गाठून शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शहरातील अनेक ठिकाणच्या आठवडे व दैनंदिन भाजीबाजारातही मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. या मोबाईल चोरट्यांचा तपास करत असतांनाच काही दिवसांपुर्वी पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मोबाईल चोरणाºया टोळीतील संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कॅनडा कॉर्नर परिसरातील सुनिल उर्फ गटºया नागू गायकवाड, वाडगाव येथिल संपत लक्ष्मण वाघ, व दिंडोरीरोड अवधूतवाडी येथिल विकी उर्फ गट्टया संजय जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने शहर व जिल्ह्यातील मोबाईल चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील दोन संशयित पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पंचवटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, रघुनाथ शेगर, हवालदार मोतीराम चव्हाण, विलास बस्ते, सुरेश नरवडे, संतोष काकड, दशरथ निंबाळकर, संदीप शेळके, महेश साळुंखे, सतीश वसावे, भूषण रायते, विलास चारोस्कर, सचिन म्हस्दे, जितेश जाधव, बाळनाथ ठाकरे आदिंच्या पथकाने ही कामगिरी केली़