पाप्या शेरगील खूनातील संशयित पवारचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:18 PM2017-09-08T23:18:02+5:302017-09-08T23:27:43+5:30
नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत १९ आॅगस्ट रोजी खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती़ यामध्ये गंभीर जखमी पवारचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि़७) मृत्यू झाला असून शुक्रवारी (दि़८)पोलीस बंदोबस्तात पवारवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
७ फेबु्रवारी २०१७ रोजी पेठरोडवरील मोती सुपर मार्केटजवळ पाप्या शेरगिल याचा खून करण्यात आला़ या खुनातील प्रमुख संशयित चेतन पवार याची शनिवारी (दि़१९ आॅगस्ट) उंटवाडीतील बाल न्याय मंडळात तारीख होती़ त्यासाठी पवार हा आपल्या आई-वडिलांसमवेत तारखेसाठी हजर होता़ यानंतर तिबेटीयन मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी गेलेल्या चेतन पवार याच्या मागावर असलेले संशयित विक्की बाळू जाधव ऊर्फ काळ्या तोतरा, पाप्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल, रोहन अहिरे, राकेश पवार, गौतम ताठे, ललित ऊर्फ लल्या सुरेश राऊत व अजय भईटा या संशयितांनी चाकू, कोयता व चॉपरने डोके व पाठीवर वार केले़
या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चेतन पवार यास प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान या प्रकरणी पुर्वी सरकारवाडा पोलिसांनी संजय रामलाल पवार यांच्या फिर्यादीनुसार जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे़ यामध्ये आता खूनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़