मोफत पेस्ट कंट्रोल करून देतो सांगणाऱ्यांपासून सावधान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 05:47 PM2018-06-06T17:47:56+5:302018-06-06T17:47:56+5:30
नाशिक : आम्ही, पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी असून तुमच्या घराचे मोफत पेस्ट कंट्रोल करून देतो असे महिलांना सागंून त्यांचे लक्ष विचलित करून घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल तसेच रोकड चोरणाºया चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे़ गंगापूर रोडवरील घटनेनंतर गोंविदनगर परिसरातही अशाच प्रकारची आणखी एक घटना घसून यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत़ या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयित संतोष केरबा कांबळे व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

गंगापूर रोडवरील एकदंत अपार्टमेंटमधील रहिवासी ज्योती बाविस्कर यांना पेस्ट कंट्रोलचा कर्मचारी असल्याचे सांगून संशयित संतोष कांबळे याने घरातील सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बागळ्या चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़४) सकाळी घडली होती़ अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा गोविंदनगर परिसरात शनिवारी (दि़२) घडला़ ज्योती नंदकिशोर कोठावदे (५५, रा. १०४, निसगार्कार रो-बंगलो, न्यू इरा स्कूलजवळ) यांना आम्ही पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी असून ‘तुमचे घराचे पेस्ट कंट्रोल मोफत करून देतो, पैसे घेणार नाही’ असे सांगून संशयित कांबळे व त्याचा साथीदार बळजबरीने घरात घुसले़
घरातील साफसफाई सुरू करून संशयित कांबळे याने कोठावदे यांना पाणी आणण्यास सांगितले़ या कालावधीत घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले़ पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी असल्याचे सांगून घरात घुसणारे व मोफत काम करून देतो असे सांगणाºयांना महिलांनी घरात प्रवेश देऊ नये तसेच तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़