सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:05 PM2021-05-31T16:05:47+5:302021-05-31T16:08:04+5:30
नाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर आल्याने जिल्हयाला लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास जिल्हा पात्र ठरला आहे. त्यापाश्व'भूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हातील कोरोनास्थितीचा आढावा घेत जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे.
नाशिक: नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ८.११ टक्के तसेच ऑक्सीजन बेडस् ४० टक्केपेक्षा कमी वापरात असल्याने जिल्ह्याला लागू असलेले निर्बंध १ जून पासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर हॉटेल्स आणि मद्य दुकानांवर असलेले निर्बंध कायम असून त्यांना केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्न सोहळ्याला असलेले निर्बंध देखील पुर्वीप्रमाणेच कायम राहाणार आहेत.
नाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर आल्याने जिल्हयाला लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास जिल्हा पात्र ठरला आहे. त्यापाश्व'भूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हातील कोरोनास्थितीचा आढावा घेत जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सर्वप्रकारची दुकाने खुली होणार आहेत. यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ११ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती. आता सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना त्यामध्ये मैडीकल, दवाखाने, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय पुर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. अंत्यविधीसाठी केवळ २० जणांनाच परवानगी असेल तर त्यानंतरच्या धार्मिक विधींसाठी केवळ १५ जणांना परवानगी असलेली परवानगी कायम आहे. लग्न सोहळ्यांना असलेली बंदी कायम असून केवळ नोंदणी विवाहांनाच परवानगी असणार आहे. मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृहे, व्यायामशाळा, सभागृहे लॉन्स, मंगल कार्यालये पुढील आदेशापर्यंत बंदच राहाणार आहे.
शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती २५ टक्के इतकी असणार आहे. कृषी क्षेंत्राशी संबंधित दुकानांना वेळ वाढवून देण्यात आलीअसून सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत त्यांची दुकाने सुरू राहाणार असल्याचे भुजबळ यांनी जाहिर केले.
हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकरी, ढाबे यांना केवळ होम डिलीव्हरीलाच परवानगी असेल. त्यांना दुकाने सुरू करता येणार नाही. सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत ते पार्सल सुविधा पुरवू शकणार आहेत. बँका, पोस्ट कार्यालयांचा व्यवहार हा सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेतच सुरू राहिल. मुद्रांक नोंदणीचे कार्यालय नियमाप्रमाणे सुरू राहाणार