गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला बकऱ्या चोरणा-या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:34 PM2018-08-11T18:34:00+5:302018-08-11T18:34:51+5:30

नाशिक : गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला पेठ रोडवरील कर्णनगर परिसरातील एका वृद्धेच्या बक-या चोरून नेण्याचा प्रयत्न करणा-या तिघांना शुक्रवारी (दि़१०) रंगेहाथ पकडण्यात आले़ या तिघाही संशयितांवर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे़

nashik,pethroad,goat,theft,three,arrested | गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला बकऱ्या चोरणा-या तिघांना अटक

गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला बकऱ्या चोरणा-या तिघांना अटक

Next
ठळक मुद्देपेठरोड कर्णनगरमधील घटना : तिघांना अटक

नाशिक : गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला पेठ रोडवरील कर्णनगर परिसरातील एका वृद्धेच्या बक-या चोरून नेण्याचा प्रयत्न करणा-या तिघांना शुक्रवारी (दि़१०) रंगेहाथ पकडण्यात आले़ या तिघाही संशयितांवर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडवरील कर्णनगरमधील भाजी मार्केटमध्ये श्यामबाई पवार या वृद्धा राहातात़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या दोन बक-या घराजवळील पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये बांधल्या होत्या़ संशयित मंगेश गौतम कटारे (२५), किरण अण्णा सोळसे (२१) व सलिम करीमखान पठाण (२६, तिघेही रा. मखमलाबाद गाव) यांनी सायंकाळच्या सुमारास पवार यांच्या शेडमधून दोन बक-या चोरून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांची चोरी पकडली गेली.

या प्रकरणी पवार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

Web Title: nashik,pethroad,goat,theft,three,arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.