नाशिक शहरात ७२८ वाहनधारकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:06 PM2018-03-01T23:06:02+5:302018-03-01T23:06:02+5:30
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाकडून टिळकवाडी सिग्नलकडे येण्यास वाहनांना बंदी केलेली असतानाही या मार्गावरून उलट दिशेने वाहने चालविणा-या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने गुरुवारी (दि़ १) दंडात्मक कारवाई केली़ याप्रमाणेच शहरात २६ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीत ७२८ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़

पंडित कॉलनी ते टिळकवाडी या रस्त्यावर होणाºया वाहतूक कोंडीमुळे पोलीस आयुक्तांनी हा एकेरी मार्ग घोषित करून या मार्गावरून उलट दिशेने वाहन चालविण्यास मनाई आहे़ याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतरही वाहनधारकांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याने गुरुवारी वाहतूक शाखा व सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये १०६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाच शासकीय वाहने तसेच विविध विभागांतील दहा शासकीय कर्मचाºयांच्या खासगी वाहनांचाही समावेश आहे़ पंडित कॉलनी परिसरात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले़
दरम्यान, गुरुवारी शहरात २६ ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे व वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन तपासणी करण्यात आली़ यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ७२८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणाºया २४२ चारचाकी व दुचाकी वाहनांवर ‘नो-पार्किंग’च्या केसेस करण्यात आल्या़ या वाहन तपासणीत वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही घडले.
पंडित कॉलनीत कारवाई केवळ वसुलीसाठी
पोलीस आयुक्तांनी शहरातील पंडित कॉलनीत एकेरी वाहतूक केल्याची अधिसूचना काढली़ मात्र, नागरिकांना सवय लागावी यासाठी किमान काही दिवस तरी पोलीस या ठिकाणी तैनात करणे आवश्यक होते़ मात्र, केवळ एक-दोन दिवस पोलीस नेमून त्यानंतर केवळ वसुलीसाठी या रस्त्याचा वापर केला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक तसेच रहिवाशांनी केली आहे़