वाडीव-हेच्या लाचखोर पोलीस हवालदारास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 08:36 PM2018-08-21T20:36:17+5:302018-08-21T20:39:07+5:30
नाशिक : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले वाडीव-हे पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदार राजेंद्र यादवराव भामरे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी. खटी यांनी मंगळवारी (दि़२१) दोन वर्षे व सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१० मध्ये वाडीव-हे पोलीस ठाण्यात सापळा रचून ही करवाई केली होती़
नाशिक : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले वाडीव-हे पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदार राजेंद्र यादवराव भामरे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी. खटी यांनी मंगळवारी (दि़२१) दोन वर्षे व सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१० मध्ये वाडीव-हे पोलीस ठाण्यात सापळा रचून ही कारवाई केली होती़
इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील तक्रारदार संतोष नारायण किरवे यांनी त्यांच्या ओळखीचा रमेश जाधव यास कामाला लावले होते़ मात्र, जाधव यास मद्याचे व्यसन असल्याने संबधित ठिकाणाहून त्यास कमी करण्यात आले़ त्यामुळे जाधव याने किरवे यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याने वाडीव-हे पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आले होते़ तक्रारदार किरवे यांनी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार भामरे यांना जाधव वर कारवाई करण्याची मागणी केली होती़ यावर भामरे याने किरवे यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़
किरवे यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने १८ मे २०१० रोजी वाडिव-हे पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचून भामरे यास लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली़ न्यायाधीश खटी याच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी साक्षीदार व सबळ पुरावे सादर केले़ या पुराव्यानुसार भामरे यास दोषी ठरवत २ वर्षे ६ महिन्यांची सक्तमजुरी तसेच १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली़