नाशिकमध्ये कत्तलीसाठीच्या अकरा बैलांची पोलिसांकडून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 05:25 PM2018-03-02T17:25:59+5:302018-03-02T17:25:59+5:30
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या ११ बैलाची शुक्रवारी (दि़२) पहाटे सुटका केली़ यामध्ये दोनशे किलो मांस आणि तीन चाकी वाहन असा ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून दोन संशयितांना अटक केली आहे़
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या ११ बैलाची शुक्रवारी (दि़२) पहाटे सुटका केली़ यामध्ये दोनशे किलो मांस आणि तीन चाकी वाहन असा ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून दोन संशयितांना अटक केली आहे़ रफिक जाफर कुरेशी (५० रा.मदरशा जवळ भारतनगर) आणि नवाज रशिद सय्यद (४५ रा.बागवानपुरा) अशी या संशयीतांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे यांना भारतनगरमध्ये बेकायदेशीररित्या बैलांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या आदेशानुसार पथकाने सकाळी भारतनगरच्या मदरसाजवळ छापा टाकला़ यावेळी संशयित कुरेशी व सय्यद हे तीन चाकी वाहनात मांस भरीत होते़ तसेच या ठिकाणी अकरा बैलही कत्तलीसाठी आणलेले होते़ पोलिसांनी वाहनात कोंबून ठेवलेल्या या अकरा बैलांची सुटका करून त्यांची गोशाळेत रवानगी केली़
पोलिसांनी या दोघा संशयीतांच्या ताब्यातून कत्तलीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे जप्त केली असून त्यांच्यावर मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक रविंद्र सहारे,उपनिरीक्षक विजय लोंढे,जमादार जाधव हवालदार सपकाळ,वाघ,पोलिस नाईक ताजणे,महाजन,दराडे,सोळसे,भालेराव,शिपाई पगारे,सानप,डंबाळे,नांद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली़