पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:51 PM2018-05-08T22:51:34+5:302018-05-08T22:51:34+5:30
नाशिक : देशी दारूच्या दुकानात तपासणी व पंचनामा करण्यासाठी गेलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचा-यांना दुकानमालकाने शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि़७) सायंकाळी भद्रकालीतील नेपाळी कॉर्नरजवळील दारूच्या दुकानात घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबकगिर गोसावी व त्यांचे सहकारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका गुन्ह्याच्या तपासासाठी फुलपाखरू देशी दारू दुकानात गेले होते. यावेळी संशयित राजेश प्रेमजी मारू व भावना प्रेमजी मारू (दोघे रा. नेपाळी कॉर्नरजवळ, भद्रकाली, नाशिक) यांनी एएसआय गोसावी व त्यांच्या अन्य सहका-यांना सरकारी काम करू नये म्हणून त्यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली, तसेच दारू दुकानाच्या बाहेर हाकलून देत पंचनामा करू न देता सरकारी कामात अडथळा निर्माण केला़
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.