पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 10:17 PM2017-08-11T22:17:30+5:302017-08-11T22:21:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पारपत्र अर्थात पासपोर्ट काढणाºया अर्जदाराला आता पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार आहेत़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत पासपोर्टसाठी आवश्यक अर्जदाराची पोलीस पडताळणी ही एम पासपोर्ट या अॅपद्वारे सुरू केली आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़ ११) या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात येऊन प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक टॅब देण्यात आला आहे़ या अॅपचा पुणे, ठाणे नंतर वापर करणारे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हे राज्यातील तिसरे आयुक्तालय आहे़
पासपोर्ट काढणाºया अर्जदारास पोलीस व्हेरिफिकेशनसाठी वारंवार पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत असत़ मात्र, आता अर्जदारांची ही धावपळ टळणार आहे़ या अॅपमुळे अर्जदाराला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज पडणार नसून पोलीस कर्मचारीच थेट अर्जदाराच्या घरी जाऊन त्याच्या छायाचित्रासह, कागदपत्रे तपासणी व रहिवासी पत्ता आदींची तपासणी करून त्याची नोंद अॅपच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात करणार आहे़ या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कागदपत्रं देणे, त्यांचा सांभाळ करणे यापासून पोलीस कर्मचाºयासह अर्जदाराचीही सुटका होणार आहे़
पोलीस आयुक्तालयात झालेल्या या मोबाइल अॅप उद्घाटनप्रसंगी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पासपोर्ट विभागात काम करणारे कर्मचारी उपस्थित होते़ यानंतर कर्मचाºयांना एम पासपोर्ट अॅपबाबत तसेच काम करण्याच्या पद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले़