चेहेडीजवळ खासगी लक्झरी बसची दुचाकीला धडक : एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:10 PM2018-07-22T23:10:31+5:302018-07-22T23:13:07+5:30

नाशिक : भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़२१) मध्यरात्री चेहेडीशिव परिसरात घडली़ गणपत म्हसू कांबळे (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, याचवेळी समोरून येणाऱ्या पिकअपचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ती उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे़

nashik,Private,bus,dash,One,killed | चेहेडीजवळ खासगी लक्झरी बसची दुचाकीला धडक : एक ठार

चेहेडीजवळ खासगी लक्झरी बसची दुचाकीला धडक : एक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देदुचाकीला पाठीमागून धडकदोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

नाशिक : भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़२१) मध्यरात्री चेहेडीशिव परिसरात घडली़ गणपत म्हसू कांबळे (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, याचवेळी समोरून येणाऱ्या पिकअपचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ती उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री पाऊण वाजेच्या सुमारास रवि शिवाजी शेजवळ (रा़ मथुरा रोड, विहितगाव) व त्यांचे नातेवाईक गणपत कांबळे हे दुचाकीवरून (एमएच १५ डीव्ही ९२५३) नाशिकहून सिन्नरकडे जात होते़ यावेळी नाशिकरोडकडून सिन्नरकडे जाणाºया भरधाव लक्झरी बसने चेहडी शिव येथील निळकंठेश्वर हॉटेलजवळ दुचाकीस पाठीमागून धडक दिली़ यामध्ये शेजवळ यांचा डावा पाय फॅक्चर झाला, तर गणपत कांबळे यांच्या डोक्यास व दोन्ही पायास जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़

दरम्यान, समोर अपघात घडत असल्याने समोरून आलेल्या पिकअपचालकाने (एमएच ०६, एजी ३८८८) क्रमांकाचा पिकअपचालकाने अपघात झाल्याने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे त्याचे पिकअपवरील नियंत्रण सुटले व पिकअप उलटल्याने चालक जखमी झाला आहे़ या अपघातानंतर लक्झरीचालक फरार झाला असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात लक्झरी बसचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashik,Private,bus,dash,One,killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.