किशोरवयीन मुलींमध्ये ‘पॅडमन’द्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:46 PM2018-03-28T22:46:05+5:302018-03-28T22:46:05+5:30

जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयींन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मुलींना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविण्यात आला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

nashik,public,awareness,'padman',film | किशोरवयीन मुलींमध्ये ‘पॅडमन’द्वारे जनजागृती

किशोरवयीन मुलींमध्ये ‘पॅडमन’द्वारे जनजागृती

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सॅनेटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेचा संदेश४०० विद्यार्थिनींना चित्रपट दाखविण्यात आला.

नाशिक : जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयींन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मुलींना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविण्यात आला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील इयता ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव-जागृती करणे व माफक दरात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता अस्मिता योजनेचा शुभारंभ राज्यस्तरावर नुकताच झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. याप्रसंगी अस्मिता योजनेची चित्रफीतही दाखविण्यात आली.
तामिळनाडूमधील कोईम्बतुर येथील अरुणाचलम मुरूगानाथन यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनेटरी नॅपकिनची निर्मिती केली. स्त्रियांच्या आरोग्यासाठी असे नॅपकिन वापरले जावेत म्हणून प्रसार-प्रचारही केला. त्यांच्या या कार्यावर हा चित्रपट आधारित आहे.
नाशिकरोड येथील आयनॉक्स चित्रपटगृहात जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालय तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील ४०० विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखविण्यात आला. पॅडमॅन चित्रपट किशोरवयीन मुलींनी बघावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.
याप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी वैशाली झणकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र देसले आदी उपस्थित होते.

Web Title: nashik,public,awareness,'padman',film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.