जिल्ह्यात रविवारी पल्स पोलीओ लसीकरण मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 06:19 PM2019-03-08T18:19:37+5:302019-03-08T18:24:35+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सुक्ष्म नियोजनानुसार जिल्हात रविवार दि. १० मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ ...
नाशिक: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सुक्ष्म नियोजनानुसार जिल्हात रविवार दि. १० मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. जिल्ह्यात ३२२५ पोलीओ बुथमधून सुमारे ४ लाख बालकांना पोलीओचा डोस दिला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात व्यापक प्रमाणात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून ग्रामीण भागात एकूण ४,०९,०७६ लाभार्थी असून ३२२५ पोलिओ बूथ मार्फत मुलांना लस देण्यात येणारे आहे. या बुथवर ८१८७ मनुष्यबळ कार्यरत राहाणार असून ६४६ सुपरवायझर मार्फत नियंत्रण केले जाणार आहे. या मोहिमेनंतर म्हणजेच रविवारनंतरही पुढील पाच दिवस घरोघरी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना ही लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, नगरपालिका रूग्णालये तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये देखील पोलीस लसीकरण मोहिमेचे बुथ लावण्यात येणार आहेत.
यासाठी २७४७ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या चमुच्या माध्यमातून सदर लसीकरण ८९ बसस्थानके, रेल्वेस्टेशन, विमानतळ या ठिकाणीसुद्धा बुथ उभारण्यात येणार आहेत. १२२ मोबाईल टीम मार्फत लसीकरण देखील करण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील तील सर्व मुला-मुलींना सदर लस दिली जाणार असून पालकांनी जागरूकपणे आपल्या बालकांना लसीकरण केंद्रांवर घेऊन यावे असे आवाहन असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .दावल साळवे, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.