जन्मदात्रीनेच मुलीला ढकलले वेश्याव्यवसायात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:16 PM2018-01-02T23:16:47+5:302018-01-02T23:23:01+5:30

नाशिक : आपल्या मुलीचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी लहानपणापासून तिच्या प्राथमिक गरजा, त्यानंतर शिक्षण पूर्ण करून तिच्या वैवाहिक सुखी संसाराची आई-वडिलांना प्रतीक्षा असते़ मात्र स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी पोटच्या मुलीला मसाज सेंटरवर कामास लावून बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे़ आपल्या जन्मदात्या आई-वडिलांविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात पीडित मुलीनेच फिर्याद दिली असून, पिटान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

nashik.pune,minor,girl,prostitutes,crime,registered | जन्मदात्रीनेच मुलीला ढकलले वेश्याव्यवसायात

जन्मदात्रीनेच मुलीला ढकलले वेश्याव्यवसायात

Next
ठळक मुद्दे पीडित मुलीनेच दिली पोलीस ठाण्यात फिर्यादजन्मदात्या आई-वडिलांविरोधात पिटान्वये गुन्हा दाखल

नाशिक : आपल्या मुलीचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी लहानपणापासून तिच्या प्राथमिक गरजा, त्यानंतर शिक्षण पूर्ण करून तिच्या वैवाहिक सुखी संसाराची आई-वडिलांना प्रतीक्षा असते़ मात्र स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी पोटच्या मुलीला मसाज सेंटरवर कामास लावून बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे़ आपल्या जन्मदात्या आई-वडिलांविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात पीडित मुलीनेच फिर्याद दिली असून, पिटान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पुण्याच्या येरवडा परिसरात राहणारे दाम्पत्य आपल्या अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीसोबत २०१६ मध्ये नाशिक शहरात वास्तव्यासाठी आले होते़ पीडित मुलीच्या आईने स्वत: व आपल्या पतीच्या उदरनिर्वाहासाठी चक्क कॉलेजरोडवरील इजीडे मॉलसमोरील ठक्कर मॅजेस्टी व्यावसायिक संकुलाच्या दुसºया मजल्यावरील एन्झी स्पा-बॉडी टॅट्यू या मसाज सेंटरवर कामास लावले होते़ या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याने तिथे कामाला जाण्यास मुलीचा नकार होता़ मात्र तिच्या आईने बळजबरीने आपल्याला अधिक पैसे मिळणार, आपले घर कसे चालणार असे सांगत तिला वेश्याव्यवसायात ढकलले़
एन्झी स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती़ या माहितीनुसार ५ आॅक्टोबर २०१६ रोजी सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ व गंगापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी छापा टाकून स्पा सेंटरमधील व्यवस्थापक मुलीसह सहा मुलींना ताब्यात घेतले होते़ यानंतर स्पा सेंटरचा मालक हेमंत परिहार (वय ३२, रा. परम निवास, कल्पतरूनगर, अशोकामार्ग) विरोधात पिटान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीने १ जानेवारी २०१८ रोजी वेश्याव्यवसायात ढकलणाºया आपल्या आई-वडिलांविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पिटान्वये दाखल झालेला हा गुन्हा शहरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्याने तो तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे़

Web Title: nashik.pune,minor,girl,prostitutes,crime,registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.