नोकरीच्या आमिषाने पुण्यातील संशयितांकडून पाच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:06 PM2018-03-09T18:06:48+5:302018-03-09T18:06:48+5:30
नाशिक : सातपूर श्रमिकनगरमधील एका इसमासह अन्य लोकांकडून नोकरीसाठी पैसे घेऊन लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
नाशिक : सातपूर श्रमिकनगरमधील एका इसमासह अन्य लोकांकडून नोकरीसाठी पैसे घेऊन लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
सातपूर पोलीस ठाण्यात नयनकुमार (रा़ उज्ज्वल सोसायटी, श्रमिकनगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणपत निवृत्ती दराडे, ममता गणपत दराडे, इंदूबाई रामदास मडके, रामदास मडके (सर्व रा. तळेगाव दाभाडे, ता़ मावळ, जि़ पुणे) यांनी नाशिक व पुणे येथे नोकरीचे आमिष दाखवून १ जानेवारी २०१६ ते ८ मार्च २०१८ या कालावधीत चार-पाच लाख रुपये तसेच इतरांकडून लाखो रुपये घेतले़ मात्र, या सर्वांची नोकरी न देता फसवणूक केल्याने या सर्वांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली़
या प्रकरणी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील दोन महिला व दोन पुरुषांवर सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़