दिव्यांगासाठी रेल्वे पास शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 05:18 PM2019-03-28T17:18:45+5:302019-03-28T17:19:48+5:30
नाशिक : शिवसह्याद्री सामाजिक संस्था व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यावतीने दिव्यांगासाठी रेल्वे पास वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक: शिवसह्याद्री सामाजिक संस्था व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यावतीने दिव्यांगासाठी रेल्वे पास वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या नोंदणी शिबीरास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शिव सह्याद्री सामाजिक संस्था नाशिक व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यावतीने हे शिबिर ठक्कर बाजार येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी शंभर दिव्यांग व्यक्तींनी रेल्वे पास नोंदणी शिबीरात नावनोंदणी केली. शिव सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी दिव्यांग व्यक्तीना भारतीय रेल्वकडून देण्यात येणाऱ्या सवलतींविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्यांना अद्यापही नोंदणी करावयाची आहे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा, सुरजित सेनगुप्ता, सतीश गुंजाळ, विशाल होनमाने,राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते