ेनाशकात पावसाची संततधार, जोरदार पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:02 PM2017-07-28T12:02:47+5:302017-07-28T12:02:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक- कालपासून शहरात संततधार पाऊस सुरु असून गोदावरीला पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील कमी जास्त होत असलेल्या दाबाच्या पटट्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात नाशकात जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.
दरम्यान संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सकाळी गाडगे महाराज पुलाच्या खाली पर्यटकांची एक लक्झरी बस अडकली होती. अथक प्रयत्नानंतर गंगा परिसरातील कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने तीला काढण्यात यश मिळविले आहे. ही बस गुरुवार सकाळपासूनच गाडगे महाराज पुलाखाली होती. पाण्याची पातळी वाढल्यामुळे बस पाण्याने वेढली होती. आता बस सुरक्षितस्थळी हलविण्यात आली आहे.
दरम्यान शहर व परिसरातील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातुन अडिच हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. शहरातील नासर्डी, नंदिनी नदिच्या पातळीतही वाढ झाली आहे. गोदाघाटावर पोलीस, मनपा प्रशासन, अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून वाढत्या पाण्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना आपापली दुचाकी, चारचाकी वाहने, दुकाने हलविण्याच्या सुचना देत आहेत. नागरिकांनी गोदा परिसरात गर्दी करु नये यासाठी त्यांनाही सुचना दिल्या जात आहे.