जागतिक हिवताप दिनानिमित्ताने रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 06:15 PM2019-04-25T18:15:14+5:302019-04-25T18:16:49+5:30
नाशिक : जागतिक हिवताप दिनानिमित्ताने शहरातून हिवताप निर्मुलन जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना सजग राहाण्याचे आवाहन करण्याबरोबरच ‘हिवताप झिरो ...
नाशिक: जागतिक हिवताप दिनानिमित्ताने शहरातून हिवताप निर्मुलन जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना सजग राहाण्याचे आवाहन करण्याबरोबरच ‘हिवताप झिरो करू या’ अशा घोषणा देत शहरातून रॅली काढण्यात आली.
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा रूग्णालय व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हिवताप जनजागरण सप्ताह अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे ,मनपा आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. त्र्यंबके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सेंधाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी हिवतापाच्या जनजागरणते ची शपथ घेण्यात आली. रॅलीची सुरु वात जिल्हा रूग्णालयापासून, जिल्हा परिषद, गंजमाळ सिग्नल, शालिमार सीबीएस मार्गे पुन्हा जिल्हा रु ग्णालयात येऊन रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये आरोग्य सेवक व सेविका यांनी सहभाग घेतला. रॅलीमध्ये कर्मचाऱ्यांनी हिवताप जनजागरणाच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधले. विविध माध्यमांचा वापर करून जिल्ह्यामध्ये जनजागरण सप्ताह सुरू करण्यात आला.
जास्तीत जास्त नागरिकांनी हिवताप विषयी माहिती घेऊन आपला परिसर आपली घरे डास विरिहत कसे राहतील त्यांची उत्पत्ती कशाप्रकारे कमी होईल याकडे सर्व लोकांनी गंभीरतेने बघितले पाहिजे व इतरांना याविषयी माहिती दिली पाहिजे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. ‘हिवताप झिरो करू, माझ्या पासुन सुरूवात करू’ असे यंदाचे घोषवाक्य असल्याचेही जाहिर करण्यात आले.