नाशिकमध्ये साई भंडा-याच्या नावाखाली खंडणी ; टोळीविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:41 PM2017-12-18T15:41:19+5:302017-12-18T15:46:56+5:30
नाशिक : साई भंडाºयाच्या नावाखाली दुकानदाराकडे जबरदस्तीने वर्गणी मागून वर्गणी न दिल्याने काऊंटरला लाथा मारून परिसरात दहशत निर्माण करणाºया टोळक्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा पाथर्डी रस्त्यालगत रमेश पक्कारामजी चौधरी (रा़वडाळा पाथर्डी रोड, पांडवनगरी, नाशिक) यांचे सम्राट स्वीट दुकान आहे़ साधारणत: आठ दिवसांपुर्वी संशयित साई सेवक मित्र मंडळ प्रणित दयावान सोशल फाऊंडेशनचे राजाभाऊ जोशी, जीवन सावंत, संदीप जाधव, आकाश राबडे व पियुष शिंदे हे साई भंडाºयासाठी वर्गणी मागण्यासाठी पावतीपुस्तक घेऊन आले़ कोणत्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन क्रमांक नसलेली ५ हजार एक रुपयांची पावती दिली व वर्गणी मागू लागले़ चौधरी यांची इच्छा नसतानाही त्यांनी दीड हजार रुपये वर्गणी दिली मात्र संशयितांनी पाच हजाांची पावती देऊन उर्वरीत पैसे नंतर येऊन वसूल करू अशी धमकी देऊन निघून गेले़
रविवारी (दि़१७) रात्री आठ वाजेच्या सुमारास चौधरी दुकानात असताना संशयित राजू जोशी हा आपल्या सहा ते सात सहकाºयांसोबत आला व पावतीचे उरलेले पैसे द्या नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ यानंतर संशयित जोशी याने तुम्हाला माहित नाही का आम्ही गौतम बागूल, प्रशांत कनकुटे, बंडू सावंत व रवी सावंत यांचे पोरं आहोत असे म्हटले तर आकाश राबडे यांनी दुकानातील काऊंटरला लाथा मारल्या़ यानंतर चौधरी यांनी पोलिसांना फोन करताच संशयित तेथून निघून गेले़ यानंतर संशयितांनी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली़