आरोग्य विद्यापीठ तत्सम विद्याशाखा परिषदेत ७० संशोधन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:36 PM2018-02-28T16:36:16+5:302018-02-28T16:36:16+5:30

महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले. यातून निवड करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

nashik,research,projects,University,health,conference | आरोग्य विद्यापीठ तत्सम विद्याशाखा परिषदेत ७० संशोधन प्रकल्प

आरोग्य विद्यापीठ तत्सम विद्याशाखा परिषदेत ७० संशोधन प्रकल्प

Next
ठळक मुद्देसंशोधनात मुली आघाडीवर विविध विद्याशाखांतील सुमारे ७० विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण

नाशिक : महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले. यातून निवड करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेज येथे राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्घाटन मुंबईचे आयएसएचएस अश्विनचे बालरोगतज्ज्ञ डॉ. शिला मथाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. देशमुख, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कांचनमाला घोरपडे, प्राचार्य डॉ. मेधा देव, विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप आवळे उपस्थित होते.
फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, बॅचलर आॅफ फिजिओथेरपी, बॅचलर इन आॅडिओलॉजी अ‍ॅन्ड स्पिच लॅँग्वेज, पॅथॉलॉजी शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांतील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. यामध्ये परीक्षकांनी सादरीकरणाचे परीक्षण करून स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आले.
पदवी विद्याशाखा गटात मुंबईचे पीडी हिंदुजा कॉलेज आॅफ नर्सिंगची विद्यार्थिनी पी.जया एन्जेल, पुण्याच्या संचेती इन्स्टिट्यूट आॅफ रिहॅबटेशनची झिस्टा पेटल, मुंबईच्या तेरणा कॉलजची श्रृती शहा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला. तर मुंबईच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजचे फिजिओथेरपी सेंटरची निधी सावला हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
पदव्युत्तर पदवी विद्याशाखा गटात मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे फिजिओथेरपी सेंटरची मनीष मिश्र हिने प्रथम, पुण्याच्या तेहमी ग्रॅन्ट इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंगची पेरूमब्राईल जिनियम हिने द्वितीय तर मुंबईच्या तेरणा फिजिओ कॉलेजची सुचेता दडास हिने तृतीय क्रमांक मिळविला. सेठ जी.एस. मेडिकल कॉलेजची दर्पणा वराडकर हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले.
शिक्षक व पीएच.डी. विद्यार्थी गटात मुंबईचे के. जे. सोमय्या कॉलेज आॅफ फिजिओथेरपीची इशा ताजणे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर पी. डी. हिंदुजा कॉलेज आॅफ नर्सिंगची मृणाल चव्हाण हिला द्वितीय क्रमांक देण्यात आला. नांदेडच्या श्री गुरुदत्त प्रतिष्ठानचे श्रीकांत दराडे यांना तृतीय क्रमांक मिळाला. सेठ जी. एस. कॉलेजची दीप्ती गिते हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
परीक्षक म्हणून डॉ. जया कुरुविला, डॉ. क्यारण पावरी, डॉ. वृषाली पन्हाळे, डॉ. जुही दवे, डॉ. मारिया जिंदानी, डॉ. जयमाला शेलये, रिया लखानी यांनी काम केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती मेश्राम यांनी केले

 

Web Title: nashik,research,projects,University,health,conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.