आरक्षणामुळे जातीय अंतर कमी होण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 03:52 PM2019-01-13T15:52:01+5:302019-01-13T15:53:49+5:30

लक्ष्मण ढोबळे : अनुसूचित जातीत अबकड प्रवर्ग लागू करावा नाशिक : सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी आरक्षण असल्यामुळे विविध घटक ...

nashik,reservation,helps,reduce,communal,distance, reservation | आरक्षणामुळे जातीय अंतर कमी होण्यास मदत

आरक्षणामुळे जातीय अंतर कमी होण्यास मदत

Next
ठळक मुद्दे राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ५८ जातींच्या लाखो दलितांनी मागणी

लक्ष्मण ढोबळे : अनुसूचित जातीत अबकड प्रवर्ग लागू करावा
नाशिक : सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी आरक्षण असल्यामुळे विविध घटक आणि निकषांवर मिळणाऱ्या आरक्षणामुळे जातीजातींमधील अंतर कमी होत आहे. ही चांगली बाब असून, आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे समर्थन करीत असल्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक मतप्रवाह असले तरी आरक्षणामुळे समाजातील जातीजातींमधील अंतर कमी होणार असेल तर आरक्षणाचे समर्थन केले पाहिजे. अनुसूचित जातींमध्येदेखील आरक्षणाचा प्रवर्ग अबकड याप्रमाणे लागू करावा, असे ढोबळे यांनी यावेळी सांगितले. अशाप्रकारचा प्रवर्ग लागू करावा यासाठी राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ५८ जातींच्या लाखो दलितांनी मागणी केलेली आहे. मेहरा, लोकूर समितीचा अहवाल केंद्रात प्रलंबित महाराष्टÑ शासनाने तत्काळ अहवालाबाबत केंद्राला शिफारस करावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
दलितांमधील अतिमागास वर्गाला न्याय देण्यासाठी सखल मातंग समाजाने मागणी केलेली आहे. या संदर्भात राज्यातील सर्व मोर्चाधारकांच्या वतीने शंभर कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. सर्व सामाजातील गरीब व अल्पभूधारकांना न्याय देण्यासाठी १० टक्के आरक्षण देण्यावर राष्टÑपतींनी स्वाक्षरी केलेली आहे. परंतु न्यायालयात आरक्षणाला दिलेले आव्हान विचारात घेता सदरचे आरक्षण टिकण्यावरच गरिबांच्या कल्याणाचे भवितव्य अवलंबून आहे.
जो समाज आक्रमक होतो, सरकारला कोंडीत पकडतो त्यांच्याच मागण्या मान्य होतात. शेवटी त्याच वाटेला मातंगांनादेखील जावे लागेल, असा इशाराही ढोबळे यांनी यावेळी दिला.
यावेळी अशोक जाधव, ना. म. मराठा, संजय शिरसाठ, राजाभाऊ थोरात, सूर्यकांत भालेराव, साहेबराव शृंगार, रवींद्र पाटील, धनंजय जाधव, दत्ता काळोखे, बाळासाहेब बेंद्रे, रवींद्र वाकळे, मधुकर बलसाने आदी उपस्थित होते.

 

Web Title: nashik,reservation,helps,reduce,communal,distance, reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.