रिक्षा, टॅक्सीचे आयुर्मान २० वर्षे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 07:41 PM2019-09-05T19:41:25+5:302019-09-05T19:44:20+5:30

पंचवटी : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांचा रिक्षा व टॅक्सी यांच्या २० वर्षे या अधिकतम वयोमर्यादे बाबतचा निर्णय मुंबई ...

nashik,rickshaw,taxi,life,expectancy,of,years | रिक्षा, टॅक्सीचे आयुर्मान २० वर्षे कायम

रिक्षा, टॅक्सीचे आयुर्मान २० वर्षे कायम

Next
ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्णय : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा ठराव


पंचवटी : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांचा रिक्षा व टॅक्सी यांच्या २० वर्षे या अधिकतम वयोमर्यादे बाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याने या वाहनांचे आयुर्मान पुर्वीप्रमाणेच २० वर्षा इतके असेल अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी पत्रकान्वये दिली आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाने २९ एप्रिल २०१३ बैठकीत ठराव क्र मांक ७/२०१३ पारेषित करून मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात मीटर टॅक्सी मूळ नोंदणी दिनांकापासून २० वर्षे, आॅटोरिक्षा १६ वर्षानंतर परवान्यावरून उतरविण्यात याव्यात व सदर वाहने स्क्र ॅप करावे असा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने राज्यातील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने याबाबत निर्णय घेण्याचे कळविले होते.
जुन्या वाहनामुळे वाढणारे प्रदूषण कमी करून पर्यावरणाला हानी पोहोचवणे कमी व्हावे, वाहनाच्या जास्तीच्या वापरामुळे वाहनाची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असते त्यातून रस्ते अपघाताची शक्यता वाढते प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळावी याबाबत विचार करून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने राज्य परिवहन प्राधिकरण ठरावास अनुसरून २१ डसेंबर २०१७ बैठकीत ठराव क्र मांक ०९/२०१७ नुसार टॅक्सी आॅटो रिक्षाची वयोमर्यादा मूळ नोंदणी दिनांकापासून २० वर्षे व कुल कॅब १२ वर्षे निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. सदर ठराव जून २०१८ मध्ये अंमलात आला त्यानुसार ३१२५ आॅटो रिक्षा तर ३२७ टॅक्सी कालबाह्य ठरले होते त्यापैकी ३१ जुलै २०१९ पर्यंत २१२७ रिक्षा व ६३ टॅक्सी स्क्र ॅप करण्यात आल्या होत्या.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या टॅक्सी व रिक्षा अधिकतम वयोमर्यादा निर्णयास हैदर मोहम्मद सय्यद व इतरांनी हरकत घेत उच्च न्यायालयात जनिहत याचिका दाखल केली होती. जनिहत याचिका दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, सुनील आहेर, भरत चौधरी यांचा मोलाचा सहभाग होता.

Web Title: nashik,rickshaw,taxi,life,expectancy,of,years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.