शासकीय कन्या विद्यालयाला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:52 PM2018-12-10T17:52:26+5:302018-12-10T17:54:03+5:30
नाशिक : जळगाव येथे सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या मुलींनी १४ वर्षांखालील गटात नाशिक जिल्ह्यात ...
नाशिक : जळगाव येथे सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या मुलींनी १४ वर्षांखालील गटात नाशिक जिल्ह्यात उपविजेतेपद मिळवून दिले. स्पर्धेतील सर्वोत्तम आक्र मक खेळाडू पुरस्कार नाशिकच्या ललिता गोबले हिने पटकाविला. विशेष म्हणजे या स्पर्धेत गेल्यावर्षी नाशिकला तिसरा क्र मांक मिळाला होता.
जळगाव येथे सोलापूर विरु द्ध नाशिक या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात सोलापूर हा संघ १५ विरु द्ध १० अशा पाच गुणानी विजयी झाला. मध्यंतराला ९ विरु द्ध ५ अशी ४ गुणांची निर्णायक आघाडी सोलापूर संघाकडे होती. नाशिककडून खेळतांना मनीषा पडेरने २ मिनिटे, ललिता गोबलेने ३ मिनिट व ४ गडी निशा वैजल २ मिनिट व २ गडी रंजना कोटिल १.३० मिनिट व १ गडी यांची अष्टपैलू कामिगरी केली.
नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण सभापती यतिन पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शासकीय कन्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापक कविता साठे यांच्यासह जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी खेळाडूंचे कौतुक केले.