एका क्लिकवर मिळणार ग्रामीणमधील गुन्हे, आरोपींची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:30 PM2017-12-08T22:30:17+5:302017-12-08T22:34:54+5:30

नाशिक : ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणारे विविध गुन्हे व आरोपींची माहिती आता नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ नागरिकांना घरबसल्या आॅनलाईन पद्धतीने आपल्या तक्रारी नोंदविता येणार असून ई तक्रार केंद्राचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़८) आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात करण्यात आले़

nashik,rural,police,online,e,complaint,facility | एका क्लिकवर मिळणार ग्रामीणमधील गुन्हे, आरोपींची माहिती

एका क्लिकवर मिळणार ग्रामीणमधील गुन्हे, आरोपींची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक ग्रामीण : ई-तक्रार केंद्र सुरुआॅनलाईन तक्रार नोंदविता येणार

नाशिक : ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणारे विविध गुन्हे व आरोपींची माहिती आता नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ नागरिकांना घरबसल्या आॅनलाईन पद्धतीने आपल्या तक्रारी नोंदविता येणार असून ई तक्रार केंद्राचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़८) आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात करण्यात आले़
आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयातील स्वागत कक्षाचे नुतनीकरण करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांसाठी महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल अंतर्गत ई -तक्रार केंद्र सुरु करण्यात आले आहे़ नागरिकांच्या तक्रारीची दखल कोणत्याही अडचणीशिवाय या ई- तक्रार केंद्रातून पोलिसांपर्यंत पोहोचणार आहे. सिटीझन पोर्टल अंतर्गत ई-तक्रार केंद्रामुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलिसांना घ्यावी लागणार आहे. आधुनिकतेच्या दिशेने पोलिसांचे हे पाउल असल्याचे दराडे यांनी यावेळी सांगितले.
ई - तक्रार केंद्र सुविधेमुळे नागरिकांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात न जाता घरातून किंवा कार्यालयातून आॅनलाईन तक्रार दाखल करता येणार आहे. तर एका क्लिकवर ग्रामीणमधील गुन्हे व आरोपींची माहिती सर्वसामान्यांना मिळणार आहे़ या उद्घाटनप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड उपस्थितांना ई-तक्रर केंद्राच्या कामकाजाची माहिती दिली. या सुविधेचा नागरिकांनी वापर करण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी केले.
यावेळी मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप पगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सीसीटीएनएस शाखेचे पोलीस निरीक्षक मांडवकर, पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव, पोलीस निरीक्षक पाटील व कर्मचारी महिला पोलीस नाईक सीमा उगलमुगले, पोलीस नाईक वैभव कुलकर्णी, भोर, विप्रो कंपनीचे प्रतिनिधी विनोद कोळेकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: nashik,rural,police,online,e,complaint,facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.