नाशिकचा अशोका मार्ग अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:15 PM2018-05-03T13:15:44+5:302018-05-03T13:15:44+5:30

पथदीप नादुरुस्त : नव्या पथदीपांना मिळेना मुहूर्त; टवाळखोरांसह चोरट्यांचा उपद्रव

Nashik's Asoka route in the dark | नाशिकचा अशोका मार्ग अंधारात

नाशिकचा अशोका मार्ग अंधारात

Next
ठळक मुद्देपथदीप नादुरुस्त : नव्या पथदीपांना मिळेना मुहूर्त; टवाळखोरांसह चोरट्यांचा उपद्रव

नाशिक : शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून उदयास आलेल्या अशोका मार्ग रस्त्याचे रुंदीकरण-डांबरीकरण पूर्ण झाले असून, या रस्त्यावरील वाहतुकीला वेग आला आहे. रात्रीच्या वेळ रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरते. कारण रस्त्यालगत असलेल्या जुनाट पथदीप नादुरुस्त झाले आहेत, तर नव्या पथदीपांना अद्याप ‘मुहूर्त’ लाभलेला नाही. अशोका मार्ग परिसर रात्रीच्या वेळी अंधाराच्या साम्राज्यात हरवितो. रस्त्याने पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांची व वाहनचालकांची यामुळे गैरसोय होत आहे. रस्त्याचे डांबरीकरण-रुंदीकरण झाल्यामुळे वाहने भरधाव जातात. यावेळी अपघाताची शक्यता निर्माण होते. रस्त्यावर रात्रीच्या वेळी असणाºया अंधारामुळे अडथळ्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. रस्त्याच्या दुभाजकाचे काम सुरू असल्याने सीमेंटचे गट्टे मध्यभागी अर्धवट स्थितीत लावले गेले आहे, तर कुठे हे गट्टे रस्त्यातच ठेवण्यात आले आहे. तसेच काही झाडेही रस्त्याच्या मधोमध असून, त्यांच्याभोवती रिफ्लेक्टर असूनदेखील वाहनचालकांच्या ते लक्षात येत नाहीत.  अशोका मार्ग अंधारात सापडल्यामुळे सोनसाखळी, मोबाइला चोरांसह टवाळखोरांचाही उपद्रव या भागात वाढला आहे. संध्याकाळ होताच या भागात रोडरोमियोंसह रायडर्स आपली ‘कर्तबगारी’ दाखविण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांची गस्त संध्याकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत नियमित सुरू असते; मात्र त्यानंतर गस्त थंडावते आणि उपद्रवामध्ये वाढ होते. याचा सर्वाधिक त्रास रात्री शतपावली करण्यासाठी बाहेर पडणाºया महिला, पुरुषांना सहन करावा लागतो.

Web Title: Nashik's Asoka route in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.