नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा बंद; पाचशे वाहकांचे काम बंद
By संजय पाठक | Published: August 4, 2023 10:42 AM2023-08-04T10:42:18+5:302023-08-04T10:43:11+5:30
विद्यार्थी, प्रवाश्यांचे हाल.
संजय पाठक, नाशिक- महापालिकेची सीटी लिंक बस सेवेतील ठेकेदाराच्या वाहकांनी काम बंद पुकारल्याने शहरातील बस सेवा आज पहाटेपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी कामगार आणि नोकरदार वर्गाचे हाल झाले. ठेकेदाराकडून जून जून महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे तसेच दंड आणि अन्य मागण्यांवर कोणत्या प्रकारे निर्णय न झाल्यामुळे या वाहकांनी काम बंद पुकारले आहेत.
कालपासूनच सोशल मीडियावर याबाबत मेसेज फिरत असले तरी महापालिकेच्या सिटी लिंक व्यवस्थापनाने वाहकांच्या आंदोलनाचा इन्कार केला होता मात्र जून महिन्याचे वेतन मिळाले नाही या कारणाखाली आंदोलन सुरू झाले आहे.
नाशिक महापालिकेने आपल्या बस सेवेसाठी वाहक पुरवण्याचा ठेका दिला असून पाचशे वाहक या अंतर्गत काम करतात त्यांचे वेतन देण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे मात्र ठेकेदाराकडून वेतन मिळाल्यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे वाहकांनी सांगितलं.