पुणे बारामती सायकलिंग स्पर्धेत नाशिकचा भारत सोनवणे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 04:12 PM2019-07-23T16:12:09+5:302019-07-23T16:13:35+5:30
नाशिक : बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय एमटीबीसायकलिंग स्पर्धेत नाशिकचा सायकलपटू भारत सोनवणे याने पहिला क्र मांकमिळविला. खुल्या गटाच्या सासवड ते बारामती अशा ८५ किमी अंतराच्या एमटीबीरेस मध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्यात त्याने२तास ३५ मिनिटे आणि १५सेकंद अशी वेळ नोंदवत सांगलीच्या सागर यामाडे याला (२ तास ३८ मिनिटे आणि४२ सेकंद) मागे टाकले.

या स्पर्धेसाठी नाशिकच्या संघात भारत सोनवणे, निखिल भावसार, शुभम पवार, रवींद्रभदाणे यांनी एमटीबी प्रकारात तर मनोज महाले व निसर्ग भामरे यांनी
पुणे-बारामती१२० रोड रेसमध्ये सहभाग घेतला होता. सर्वच सहभागीसायकलपटूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सायकलपटूंसोबत स्पर्धा करण्याचीसंधी या निमित्त मिळाली.या खेळाडूंना नाशिकमध्ये छत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर शेट्टी यांचे प्रशिक्षण लाभले आणि नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेचे सचिव नितीन नागरे वअॅड. योगेश टिळे यांचे सहकार्य लाभले. (23स्पोर्ट्सभारतसोनवणे)